ayurgarden

आयुर्वेदिक वनस्पती जोपासण्याच्या छंदासाठी

Tag Archives: सर्दी खोकला

लसूण (Garlic)

माहिती

 • भारतात सगळीकडे होणारी आणि वापरली जाणारी छोटी वनस्पती
 • कांद्याचा कुळातील महत्वाची

  लसूण

 • पाने अरुंद , सपाट
 • कंदा मध्ये 6 ते 35 पाकळ्या असू शकतातत्यावर पांढरे चमकदार,पारदर्शक आवरण असते

औषधी गुणधर्म

 • हार्टअटॅक ला प्रतिबंध करणारी म्हनून प्रसिद्धं औषधी
 • रकतदाब कमी करणारी॰
 • मसाल्यात कामोतेजक म्हणून
 • अपचन, गुबारा, पोटदुखी वर गुणकारी
 • डांग्याखोकला झाला असेल तर उपयुक्त
 • जंतूंनाशक
 • आरोग्यावर्धक गुणांमुळे रोज वापरली जाते
 • दमा,बहिरेपणा छातीत कफ साठणे यावर गुणकारी
 • लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून वापर
 • पोट्फुगी वर लसूणपाकळ्यांनी सिद्ध केलेला भात आहारात महत्वाचा ठरतो
 • हृदयास उत्तेजना देऊन सूज कमी करण्याचे अतिशय महत्वाचे काम लसूण करतो
 • अनावश्यक मेदा वर हा काम करतो
 • संधिवातासाठी दाहशमक महणून ह्याचा वापर करतात
 • अर्धांगवातआणि आमवात यावर अतिशय उपयुक्त समजला जातो
 • उष्णगुणधर्मचा असतो त्यामुळे छाती आणि पोटावर लसूण तेल जिरवले तर थंडीचा त्रास होत नाही

पाककृतीत वापर

लसूण फुल

लसूण पाकळ्या वापरून सिद्धा केलेला भात
गायीचा तुपात तळलेली लसूण
लसूण चटणी, लसूण दाण्याची चटणी, लसूण पतीची चटणी, लसूण कोथिंबीर चटणी, लसूण फळ्याची आमटी
लसूण तेल – सूप
, सार, कढण यात वापर केला तर ते फर रुचकर लगतात.

सर्वसामान्य उपाय

 • शरीरातील अनावश्यक चरबी घालवायची असेल तर लसणी सारखे औषध नाही त्यामुळे तो रोजचआहारात हवा
 • लसूण पाकळ्या गळून दुधातला काढा पचन विकारात दिला जातो
 • लसूण जंतूंनाशक असल्याने पालेभाज्या आणि आमटीत त्याचा वापर सढळ हाताने करतात
 • त्याच्या कृमिनाशक गुणांमुळे लसूण चटणी फायदेशीर ठरते
 • कोलेस्टेरोल चे प्रमाण योग्य ठेवायचे असेल तर तुपात तळलेळी लसूण आणि मऊ भात आहारात ठेवणे श्रेयस्कर समजले जाते
 • रक्तशुद्ध करत असल्याने सूप , आमटी आणि वर फोडणीच्या वरणात तिचा शक्यातित्का वापर करावा
 • मासीक पाळीच्यावेळी अंगावर साफ जायला हवेअसेल तर लसूण आवर्जून वापरावी
 • ट्रेक ला गेल्यावर अचानक शुद्ध हरपाळी तर लसूण हुंगायला देतात

  लसूण फुल - जवळून

 • लहान मुलांचा पेजेत लसूण वापरली तर ती स्वेदल असल्याने (घाम आणणारि) ज्वरविकारात उपयोगी ठरते
 • लसूण घालून केलेले उडदाचे वडे तिळाचा तेलात तळून खाल्ले तर पोटफुगी आणि अर्धांगवातात उपयोग होतो.

लागवड आणि काळजी

आपल्याकडे छान जपासता येणारी आहे. थंड कोरडे हवामान मानवते. लागवड ऑक्टोबर मध्ये करावी 5-6 महिन्यात गड्डा भरतो. रसरशीत लसूण पाकळी जमीन बुसभुशीत करून लावावी. मोडची बाजू वर ठेऊन वाफ्यात किवा कुंडीत अगदी कशातही लसूण छान येतो.

अधिक माहिती

Botanical name : Allium sativum L.

Family                   : LILIACEAE

Common name   : Garlic

Sanskrit name     : लशुन, अरिष्ट

Part used              :Rhizome

RET Status            : N/A

Advertisements

आले (Ginger)

आले

माहिती

 • झाड साधारण 2 इंच ते 3 फूट उंच
 • जमिनीखालील कंद म्हणजे आले
 • जांभळ्या रंगाची फुले, बांबूच्या झाडासारखी लांब निमुळती पाने
 • आल्याची पाने पिवळसर दिसू लागल्यावर खालील कंद तयार झालेला असतो
 • आले चुन्याच्या निवळीतून काढून उन्हात उकळल्यावर सुंठ तयार होते
 • वायुनाशक – महाऔषधी म्हणून आयुर्वेदात वापर
 • बागेत सहज येते

औषधी गुणधर्म

 • वायुनाशक
 • शरीरातील द्रव पदार्थांचे दोष दूर करणारे
 • स्नायूमधील वेदना कमी करण्यासाठी
 • मसाल्यात कामोत्तेजक म्हणून

  आल्याचे झाड

 • अपचन, गुबारा, पोटदुखी यावर गुणकारी
 • सर्दी, खोकला, दम लागणे यासाठी याचा वापर नक्की केला जातो

पाककृतीत वापर

 • आलेवडी
 • पाचक
 • वाळवलेले आले
 • आल्याचे लोणचे
 • आले खोबर्‍याची चटणी
 • आलेपाक
 • गोडआले रस
 • आल्याच्या वड्या
 • आले पुदिना सरबत
 • सुंठवडा
 • सुंठीचीकढी
 • सुंठीच्या गोळ्या
 • सुंठेपाक
 • ह्या शिवायआमटी भाजी आणि रोजचा चहा ह्यात आल्याचा वापर नेहेमी करावा

सर्वसामान्य उपाय

 • आले आणि मीठ एकत्र खाल्ले असता भूक वाढते, रूची उत्पन्न होते, कंठ सुधारतो, आजीर्ण होत नाही
 • आले मीठ आणि लिंबू पोटाच्या विकारांवर आणि सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे
 • आल्याचा रस जर घेतला तर स्नायू दुखी कमी होते
 • उचकी थांबवण्यासाठी आले रसाबरोबर खडीसाखर घेतात
 • थंडी पासून आणि त्यामुळे होणार्याख खोकला, सर्दी, कफ या त्रासंपासून वाचण्याकरता आल्यासारखे दुसरे गुणी औषध नाही
 • कफ प्रकोपावर सुंठवडा अतीशय रामबाण आहे
 • शौचाला पातळ होत असेल तर सुंठचूर्ण ताकबरोबर घेतल्यास आराम पडतो

  आल्याचे फूल

 • रक्त शुद्धी साथी आले आहारात जरूर वापरावे.
 • आले कोमट पाण्याबरोबार खाले तर मासिक पाळीत होणारी पोटदुखी एकदम कमी होते.

लागवड व काळजी

 • सर्व प्रांतांमध्ये शेती करणे शक्य असेलेली ही महत्वाची वनस्पती आहे
 • आपल्या गच्चीत किंवा बागेत आल्याची कुंडी छान जोपासता येते
 • बागेत वाफ्यात किंवा कुंडी मध्ये प्रथम जमीन बुस्बुशीत करून शेणखत, कडूनिंब पेंड, जंतुनाशक मातीत मिसळून पाणी देऊन मग लावताना निरोगी रसरशीत चांगल्या मोठ्या कांदाचा उपयोग करावा
 • मे महिन्यात कांदा लावला तर त्याला सहा सात महिन्यात फुले येऊ लागतात. आत गड्डा मोठा होऊ लागतो त्यावेळी पाणी योग्य तेवढेच द्यावे. पाणी साठले तर आले नीट येत नाही

अधिक माहिती

Botanical name :Zingiber officinale ROSC

Family                   :ZINGIBERACEAE

Common name   : Ginger

Sanskrit name     : आर्द्रका

RET Status            : N/A

Part used              : Rhizome